0(0)

PM Yuva Entrepreneurship Program [Marathi]

  • Total Enrolled 0
  • Last Update June 23, 2020

Description

प्रधान मंत्री युवा उद्यमीता विकास अभियान योजना:

प्रधान मंत्री युवा उद्यमीता विकास अभियान ही कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे प्रामुख्याने राबविण्यात येणारी योजना आहे. उद्योजकता विकास व उद्योजक क्षमता  निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यातून स्वयंरोजगाराची उभारणी करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्टं आहे.  प्रशीक्षणार्थीं केवळ एका विषयात कौशल्य प्राप्त करून उद्योजक क्षमता विकसित नाही करू शकत, त्यासाठी कौशल्य आणि उद्योजकता विकास या दोघांची जोड असणे गरजेचे आहे.

ध्येय: अस्तित्वात असलेल्या उद्योगाची व्याप्ती वाढवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यमान उद्योजकांना तसेच स्वताचा नवीन उद्योग स्थापन करण्यास इच्छुक असणाऱ्या संभाव्य उद्योजकांना उद्योजकता प्रशिक्षण व योग्य ते मार्गदर्शन देऊन उद्योजकतेचा विकास करणे व त्या माध्यमातून रोजगार निर्मितीला गती देणे हे या योजनेचे ध्येय आहे. 

मिशन:  उद्योजकतेला रोजगाराचा एक प्रभावी पर्याय म्हणून प्रोत्साहन देणे आणि युवा उद्योजकांना प्रारंभीच्या काळात सहाय्य करून त्यांना सक्षम करणे 

उद्दिष्ट: उद्योजकता प्रशिक्षण, मार्गदर्शन, उद्योजक वर्गातील लोकांशी ओळख तसेच उद्योग उभारणीसाठी लागणारा उपरोक्त सल्ला या सारख्या बाबींच्या माध्यमातून युवा वर्ग, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांवर लक्ष्य केंद्रित करून उद्योजकता विकासासाठी एक प्रभावी व्यवस्था निर्माण करणे 

या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे खाली नमूद केली आहेत:

 अ. उद्योजकता जागृती : उद्योजकतेला करिअर चा प्रभावी पर्याय म्हणून विद्यार्थी तसेच तरुणांमध्ये या विषयी जागृती करणे.

ब. उद्योजकता शिक्षण आणि प्रशिक्षण: उद्योजकता विकासासाठी अनुकूल व कार्यक्षम व्यवस्था तयार करून विद्यमान आणि संभाव्य उद्योजकांना उद्योग उभारणीमध्ये सहाय्य करणे 

क. मार्गदर्शन आणि आधार देणे: नोडल ई-हब  आणि प्रो-बोनो मार्गदर्शकांद्वारे संभाव्य आणि विद्यमान उद्द्योजकांना मार्गदर्शन करणे.

ड. स्पर्धा आणि पुरस्कार:  उद्योग संबंधी स्पर्धांचे आयोजन करून निवडक संभाव्य उद्योजकांना पारितोषिक वितरण करणे आणि या कार्यक्रमांच्या आयोजनातून त्यांच्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देणे. 

About the instructor

0 (0 ratings)

3 Courses

1 students

Placeholder
Free
Scroll to Top